अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – दि. ०४/०५/२०२१ मंगळवार रोजी,शिक्षक परिषद प्राथमिक चे संस्थापक व आमदार संजयजी केळकर यांच्या मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक विभागाचे अध्यक्ष राजेशजी सुर्वे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक विभागाचे कार्यवाहक पुरुषोत्तमजी काळे यांच्याशी झालेल्या चर्चे नुसार कोरोनाच्या कालावधीत आपल्या समाजाचे आधार स्तंभ असणाऱ्या व कोरोनाशी लढणाऱ्या सर्वांसाठी सामाजिक बांधिलकी जोपासत धनराज विसपुते फाउंडेशच्यावतीने फाउंडेशनचे अध्यक्ष व आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते यांनी शिक्षक परिषदेचे सुशील वाघमारे यांचे कडे २०० सॅनिटायझर व २०० N95 मास्क सुपूर्द केले सोबत बी. एड कॉलेजचे (पनवेल) प्राचार्य डॉ. सीमा कांबळे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.






