डॉक्टर पडोळे दिव्यांगांसाठी देवदूत – साईनाथ पवार

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – आज कोव्हीड 19 सारख्या महामारीने थैमान घातलेले असताना . या आजाराच्या भीतीनेच लोक जीव सोडत आहेत त्याचा त्यातच बरीचशी मंडळी कोव्हिड आजार. झालेल्या लोकांचा तिरस्कार करत आहेत त्यांच्याजवळ कोणी जात नाही तुच्छतेची वागणूक दिली जाते .

हा आजार तसा पाहिलात तर धीर दिल्याने खरा बरा होतो ‌ उदाहरण सांगायचं झालं तर अलिबाग जिल्हा रुग्णालयात काम करणारे डॉक्टर विक्रमजीत पडोळे MD Medicine , Physician , Civil Hospital Alibag हे दिव्यांगांना पाहतातच आस्थेने त्यांच्याजवळ जाऊन विचारपूस करतात त्यांना धीर देतात आणि त्यांच्यावर उपचार करतात आज सांगायचं झालं तर फक्त डॉक्टर यांनी खाद्यांवर हात टाकून तुम्ही बरे होणार असा धीर दिला तरी अर्धा रुग्ण बरा होतोय.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मला कोरोना आजार झाला होता. मी खाजगी डॉक्टर कडे इलाज केला पण तब्येत बिघडली मग मी सिव्हिल रुग्णालयात गेलो तेथे ही खुप गर्दी होती.काही सुचेना कोणी धड उत्तर देत नव्हते पण त्याच वेळेस मला पाहून डॉ.विक्रमजीत पडोळे देवासारखे धावून आले.आणि माझ्यावर योग्य उपचार केल्यानेच आज मी जिवंत आहेमाझ्याबरोबरच इतरही बराच दिव्यांग व्यक्तींना व ज्येष्ठ नागरिकांसाठी या कठीण परिस्थितीमध्ये डॉक्टर पडोळे खरोखर देवदूत ठरतआहेत.अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली. स्वतः कामाच्या वेळेव्यतिरिक्त देखील डॉक्टर विक्रमजीत पडोळे साईनाथ पवार यांच्या बरोबर दिव्यांगांसाठी कोव्हिड १९ व इतर वैद्यकीय समस्या बाबत मोलाचे काम करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here