पुरातत्त्व शास्त्राचे अभ्यासक डॉ. भगवान चापेकर यांचे निधन

पुणे (प्रतिनिधी) – जुन्या पिढीतील पुरातत्त्व शास्त्राचे अभ्यासक डॉ. भगवान चापेकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. उस्मानाबाद जिल्ह्यात तेर या गावी 1950 च्या दशकात झालेल्या उत्खननात त्यांचा मोठा सहभाग होता.

ते उत्खनन आणि त्यात सापडलेल्या वस्तूंवर आधारित त्यांनी जो शोध निबंध पुणे विद्यापीठाला सादर केला, त्याबद्दल त्यांना डॉक्‍टरेट पदवी मिळाली होती. त्यांनी शाहू कॉलेजात काही काळ अध्यापनाचे काम केले. वृद्धापकाळातच त्यांना करोनाने गाठले होते, त्यातच त्यांचे निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here