अक्कलकोट (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – संपूर्ण देशात कोरोना धुमाकूळ घातलेला आहे,अनेक लोक मृत्युमुखी पडलेल्या आहेत,शासनाच्या निर्बंध मुळे अनेक गरीब लोकांचे काम बंद त्यामुळे उपासमार होत आहे,अश्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तोंडावर आलेल्या पवित्र रमजान ईद हा सर्वात महत्त्वाचा सण आहे जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी गरीब लोकांना मदत करावे जेणेकरून ते पण सण साजरा करतील शहरातील श्रीमंत व गरीब लोक हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा याकरिता अक्कलकोट मुस्लिम युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहर वाशियाना विनंती करण्याकरीता घरी घरी जाऊन विनंती करण्याची मोहीम करण्यात येत आहे.
ईद हा आनंद साजरा करण्याचा सण असला तरी लॉकडाऊन मुळे देशाचा झालेला आर्थिक नुकसान बहुत अशा कष्टकरी समाज बांधवांनी त्यांना त्यांचा बसलेला फटका यामुळे संवेदना म्हणून सर्वांनी या वर्षीही ईद कोणत्याही डाम डोल न करता नवीन कपडे प्रधाने खरेदी न करता अत्यंत साधेपणाने साजरी करावी आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी इतरांना मदत करावी , त्यातून लॉकडाऊन च्या सर्व नियमाचे पालन व्हावे कोरोना चा मुकाबला करण्यासाठी आपले महत्त्वाचे योगदान असावे याकरिता समाजातून प्रयत्न होत आहेत मुस्लिम धर्मातील महत्त्वाचा सण आहे की ईद उल फित्र म्हणजे च रमजान ईद हे आनंद साजरा करण्याची मानली जाते
सामुदायिक प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे यातील इत्र या शब्दाचा अर्थ दान करणे असा आहे रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर किंवा मस्जिद मद्ये नमाज अदा करायला जातात ईद चा उत्सव आहे कुटुंबातील लहान थोर पासून सगळ्यांच्या आनंदात सहभागी होतात त्यासाठी घर सुशोभित केले जाते, मिष्ठान बनविले जातात शिरकुर्मा, मिठाई, गुलगुले खाऊ घालण्यासाठी मित्रांना नातेवाईकांना आमंत्रण करतात,कोरोनाचा अक्कलकोट मध्ये रुग्णांची संख्या वाढलेलं असल्याने त्यामुळे सावधान गिरीची सर्वांची गरज आहे सण म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा त्रास सर्वांनाच होणार आहे त्यामुळे करुणाप्रति बंदला गालबोट लागेल अशी कोणतीही गोष्ट होता कामा नये यासाठी सर्व कार्यकर्ते लक्षवेधी आहेत
गेल्या वर्षापासून सुरू असलेला कोरोना व लॉकडाऊन, मुळे सर्वांनाच आर्थिक फटका बसला आहे समाजातील बहुतेक लोक कष्टकरी वर्गातल्या आहेत त्यांच्या हाताला काम नाही त्यामुळे आर्थिक दूरदृष्टी यात ते सण साजरा करू शकणार नाहीत असल्यांना मदत करण्याची गरज आहे ईदच्या शुभम परवाला गरीब समाजबांधव आनंदापासून वंचित राहत असेल तर ती ईद आनंदाची नाही असे मानले जाते,ईद अत्यंत साधेपणाने साजरा केल्यास प्रशासनास पण सहकार्य केले असे होईल व कोरोना चा प्रादुर्भाव पण वाढणार नाही,या मुळे मुस्लिम बांधवांचे कौतुक होईल,आपल्या जिल्ह्यात,राज्यात आपले अक्कलकोट नगरीचे सर्वांकडून कौतुक होऊन एक आदर्श निर्माण होईल.






