परतूर कोरोंना मुक्त झाले असताना पुन्हा चिंतेत पडली भर
परतूर (इम्रान कुरेशी) – शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर पती पत्नी सह सत्तर वर्षीय व्यापारी व एक पन्नास वर्षीय महिला कोरोंना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे . परतूर कोरोंना मुक्त झाले असताना पुन्हा चिंतेत भर पडली आहे. येथील प्रतिष्ठित समजल्या जाणारे व्यापारी हे औरंगाबादला जाण्यासाठी घरातील एक जणांना घेऊन निघाले. औरंगाबादला चेकपोस्ट वर कोरोना तपासणी केली असता. व्यापारी हे पॉझिटिव्ह तर एक जण निगेटिव्ह आढळला.
शहरातील मेन रोडवरील प्रतिष्ठित डॉक्टर हे मेहकर येथे त्याची आईचे निधन झाल्याने मेहकरला गेले होते. तिथे त्याची आईचे निधना पूर्वी कोरोंना तपासणीसाठी स्वब घेण्यात आले होते निधनानंतर तपासणी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. येथे डॉक्टर पती पत्नी संपर्कात असल्याने त्यांची तपासणी केली असता डॉक्टर निगेटिव्ह आले. तर पत्नी पॉझिटिव्ह आढळल्या.
नंतर डॉक्टर यांना ताप येत असल्याने जालना येथे खाजगी रुग्णालयात भरती झाले झाले. तिथे त्यांची तपासणी केली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाला.तसेच कायमखनी गल्लीतील एक पन्नास वर्षीय महिलेला दम लागत असल्याने औरंगाबाद येथे उपचार घेण्यासाठी दाखल झाली असता तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला आला असल्याची माहिती तालुका आरोग्य आधिकारी डॉ. झेड एच सय्यद यांनी न्युज जालना प्रतिनिधीशी बोलतांना दिली. व्यापारी व 50 वर्षीय महिला हे औरंगाबाद येथे उपचार घेत असून डॉक्टर दापंत जालना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या आहे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या संपर्कातील एकूण 24 व्यक्तींना होम कोराटाईन करण्यात आलेले आहे .यापैकी अति जोखमीचे 13 जणांचे आज लाळेचे नमुने तपासणीसाठी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.







