लॉकडाऊनमध्ये जाळूशात सुरू अनधिकृत बांधकाम-प्रभाग समिती आणि पोलिसांच्या करवाईवर प्रश्नचिन्ह
ठाणे (मुनिर खान) – एकीकडे ठाण्यात वाढत्या कोरोनाच्या प्रदूर्भावाला रोखण्यासाठी अवघे पालिका प्रशासन आणि प्रभाग समिती व्यस्त असतानाच लोकमान्य- सावरकर नगर प्रभाग समितीत म्हाडा वसाहतीत ठेकेदार आनंद परब प्रभाग समितीच्या लिपिकाच्या जोरावर अनधिकृत तळ + 2 माळे चढविण्याचे काम जल्लोषात सुरू आहे. स्थानिक नगरिकांमध्ये एकाच चर्चा सुरू असून लॉकडाऊनमध्ये अनधिकृत बांधकामामुळे प्रभाग समिती आणि स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीच्या हद्दीत म्हाडा वसाहतीत प्लॉट नं 30 संध्या छाया सोसायटी, प्लॉट नं 15 गजानन सोसायटी,प्लॉट नं ५३ मधुरा सोसायटी या ठिकाणी मूळ घरे पाडून त्याठिकाणी तळ + 2 मजले यांचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम आर.सी.सी करण्यात येत आहे. लॉकडाऊन मध्ये माणसाला घराबाहेर पडणे मुश्किल होते. मात्र लोकमान्य- सावरकर नगर प्रभाग समितीच्या लिपिक ओंकार नाखवा याच्या आशीर्वादाने ठेकेदार आनंद परबजल्लोषात बांधकामाचे काम सुरू आहे. यामुळेच स्थानिक नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहेत. तर रस्त्यावर भाजी विकणाऱ्यांना अतिक्रमण केले म्हणून दंडात्मक कारवाई करणाऱ्या वर्तकनगर पोलिसांना मात्र वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे रेती, वीट,आणि रेबित रस्त्यावर टाकलेले दिसले नाही यामुळेच प्रभाग समिती अधिकारी आणि पोलिसांच्या कार्यप्रणालीवर आता प्रशचिन्ह निर्माण झाले आहे. म्हाडा वसाहतीत अनधिकृत मजले चढविणाऱ्या ठेकेदार याच्यावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई करावी. तर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी खोली मालकवरही गन हा दाखल करावा अशी मागणी पत्रकार व समाजसेवक मुनिर खान यांनी केली आहे. तर अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या प्रभाग समितीचा लिपिक ओंकार नाखवा याची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी आशा आशयाचे निवेदन मुनिर खान यांनी पालिका आयुक्त आणि पोलीस आयुयकात याना लेखी स्वरूपात केले आहे.







