मयुर बोरसे पाटील यांची धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड

दोंडाईचा (संतोष कोळी) – आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे,अतिशय जहाल आणि लढाऊ व्यक्तिमत्व,धुळे जिल्ह्यातील युवकांचा बुलंद आवाज मयुर बोरसे-पाटील यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने आणि अनिल गोटे, किरण शिंदे, संदीप बेडसे, रणजित राजे भोसले, किरण पाटील यांच्या शिफारशीने त्यांच्यावर धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या धुळे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पदाची जबाबदारी सोपविली गेली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे महाराष्ट् प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या हस्ते देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here