दोंडाईचा (संतोष कोळी) – प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी किमान एका वृक्षांची लागवड करुन त्यांचे संगोपन केले पाहिजे कारण वृक्षामुळे
पर्यावरणाचा समतोल राखला जातो ,पर्जन्यमानात वाढ होते ,वातावरणात उष्णतेच्या प्रमाणात घट होते परिसरात थंडगार व आल्हादायक वातावरण तयार होते तसेच फळे ,फुले आल्यामुळे पक्षी बागडु लागतात इ अनेक फायदे वृक्षांमुळे होतात त्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीनां दरवर्षी किमान एक वृक्ष लागवड करुन संगोपन करण्याचा संस्कार जेष्ठांनी करण्याचे प्रतिपादन उद्योगपती सरकारसाहेब रावल यांनी रोटरी क्लब आँफ दोंडाईचा सिनियर्सतर्फे आयोजित वृक्षारोपण मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी केले यावेळी प्रमुखपाहुणे रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत जानी ,सौ हेता जानी ,श्रीकांत इंदाणी ,अनिस शाह ,चेतन सिसोदिया ,सौरभ मुणोत इ मान्यवर उपस्थित होते .
रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया यांनी सांगितले की रोटरी सिनियर्सतर्फे दोंडाईचा शहरातील सर्वप्रथम वृक्ष लागवडीची मोहिम २००० साली रोटरी मार्गावर करण्यात आली होती आज तो परिसर शहरातील निसर्गरम्य ठिकाण म्हणुन ओळखला जातो त्याचप्रमाणे यावर्षी दोंडाईचा शहरातील दादा नगर , धुळे डायव्हर्सन रोड ,रामीचे महादेव मंदिर परिसर इ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पाटील , राजेंद्र परदेसी यांनी तर आभार प्रदर्शन सचिव राजेश माखीजा यांनी केले . वृक्षारोपण मोहिम यशस्वी होण्यासाठी माजी अध्यक्ष डॉ सचिन पारख ,जेष्ठ सदस्य डॉ रविंद्र टोणगांवकर , डॉ आशाताई टोणगांवकर , डॉ मुकुंद सोहनी , डॉ अनिल सोहनी ,सुरेश जैन ,सौ अनूराधा सोहनी ,राजेश मुणोत , डॉ सोहनलाल पारख ,राजेश भंडारी ,नामदेव थोरात ,वाल्मीक अडगाळे ,विजय अडगाळे ,राजेश टोणगांवकर ,केटी ठाकुर ,सुंदर चैनानी ,संजय छाजेड ,रमेश पारख ,प्रदीप पारख ,हुसेन विरदेलवाला ,अँड नितीन अयाचीत , डॉ राजेंद्र पाटील , डॉ दिपक श्राँफ , डॉ राजेंद्र गुजराथी ,शेखर कोठारी , महेंद्र चोपडा , डॉ हितेंद्र देशमुख ,सुमित जैन ,डॉ अनिल धनगर , डॉ गणेश खैरनार ,सौरव अग्रवाल, अनिल पुरसवाणी ,नितेश माखीजा ,मुर्तुझा कादीयानी ,चेतन जैन ,प्रविण महाजन ,जवाहर केसवानी , डॉ अनिकेत मंडाले , डॉ मोहित अग्रवाल ,अमन जयस्वाल इ सदस्यांनी प्रयत्न केले .







