आरोग्य विभागात 16000 पदांची भरती

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे त्यासाठी विविध संवर्गातील 16 हजार पदे तातडीने भरण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.

100 टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याने आता गट क आणि ड संवर्गातील 12 हजार पदे भरण्यात येतील. त्यामध्ये नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, वाहनचालक, शिपाई अशी पदे भरण्यात येतील. तर गट अ आणि ब मध्ये प्रत्येकी 2000 पदे अशी एकूण 16 हजार पदे भरण्याची शासन स्तरावरील प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करू. ही सर्व पदे भरल्यानंतर त्याचा निश्चित सकारात्मक परिणाम रुग्ण सेवेवर जाणवेल असा विश्वासही टोपे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here