परंडा रुग्णालयातील अस्वच्छतेच्या तक्रारी वरून आढावा बैठकीत आमदार सावंत भडकले

  • तात्काळ उपाय योजना करण्याच्या दिल्या सूचना

धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे) – परंडा, भुम ,वाशी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी गुरुवार दि ६ मे रोजी परंडा उप जिल्हा रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. या वेळी रूग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात पाणी नाही, तसेच शौचालयात घाण असल्याची तक्रार आमदार सावंत यांच्याकडे केली.

tanaji-sawant-at-paranda-hospital

उपजिल्हा रुग्णालयास तत्काळ पाणी पुरवठा करून स्वच्छता करण्याच्या सुचना नगर परिषदेला आमदार सावंत यांनी दिल्या. कोरोना रुग्णावर उपचार व उपाय योजनाची तहसिल कार्यालयात अढावा बैठक घेण्यात आली यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत , कृषी व पशू सवंर्धन सभापती दत्ता साळुंके, जिल्हा प्रमुख गौतम लटके , ता प्रमुख आण्णासाहेब जाधव , जिल्हा संघटक मेघराज पाटील, माजी नगर अध्यक्ष सुभाष सद्दीवाल , शाम मोरे ,तहसिलदार अनिल कुमार हेळकर , तालूका आरोग्य अधिकारी डॉ सय्यद , डॉ पठाण , पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे, सहाय्यक गटविकास आधिकारी आर , ए .राठोड डॉ शहाजी मिस्कीन, नगरसेवक रत्नकांत शिंदे , पोपट चोबे , सतिश मेहेर, उपस्थित होते .

मागील आठवड्यात सावंत यांनी परंडा उप जिल्हा रुग्णालय व कोवीड सेंटरला भेट देऊन रुग्णा साठी स्वखर्चाने औषध पुरवठा करणार असल्याची घोषणा केली होती . तसेच रुग्णासाठी प्लाझमा दान करणाऱ्यांची यादी करा प्लॉझमा दान करणाऱ्यांना पाच हजार रुपये बक्षीस देण्याचे जाहिर केले होते.

mla-tanaji-sawant

आमदार सावंत यांनी घोषणा केलेले औषधे एकाच दुकानात उपलब्ध होत नसल्याने विविध दुकानातुन जमा करणार असल्याची माहिती डॉ पठाण यांनी अढावा बैठकीत दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ सय्यद यांनी प्लॉझमा दान करणाऱ्यांची यादी व प्रक्रीया विषयी माहिती अढावा बैठकीत दिली. परंडा येथील बैठकी नंतर सोनारी येथील कोवीड सेंटरचा शुभारंभ आमदार तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here