अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – कोरोनाच्या महामारी संकटात जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी अलिबागमधील व्यापारी उमेश मोरे, दिलीप जैन, सुरजकुमार यादव, कांतीलाल जैन यांनी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा सामान्य रुग्णालयाला 24 पंखे देण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्याकडे गुरुवारी 6 मे रोजी हे पंखे देण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल फुटाणे, डॉ. अमोल भुसारे, नगरसेवक अनिल चोपडा, रवि थोरात, गणेश मांजरेकर उमेश मोरे, दिलीप जैन, आदी उपस्थित होते सुरजकुमार यादव कांतीलाल जैन हे अलिबागमधील प्रसिध्द व्यापारी आहेत. उद्योग व्यवसाय सांभाळत असताना गरजूंना मदत करण्याचे काम ते करीत आहेत.अनेकांना त्यांच्याकडून मदतीचा हात देण्यात आला आहे.
सध्या कोरोनाचे सावट आहे. या सावटाखाली संपुर्ण रायगड जिल्हा आहे. अलिबागमधील जिल्हा रुग्णालयासह अन्य रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. या महामारीच्या संकटात जिल्हा रुग्णालयाला मदत म्हणून व्यापाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाला 24 पंखे वाटप केले आहेत.






