अक्कलकोटमध्ये उत्तर पोलिस ठाण्याकडून अनोखी जनजागृती

अक्कलकोट (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – नातीसोबत तोंडाला पदर लावून बाजारात जाणाऱ्या आजीला पोलिस निरीक्षकांनी लावला मास्क.उत्तर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार साहेब यांनी आज बस स्थानका समोर थांबून मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांना मास्क वाटप करून आपल्या प्रशासकीय कार्याची वेगळी चुणूक दाखवून दिली.

मास्क का घातला नाही म्हणून दंड अथवा शिक्षा करण्याऐवजी मास्क भेट देऊन लोकांचे कृतीतून जनजागरण करणाऱ्या पवार साहेबांबद्दल अक्कलकोट शहर तालुक्यात कृतीशील परिवर्तन घडवणारा अधिकारी म्हणून सकारात्मक चर्चा होऊ लागली आहे. आपल्या नातीसोबत नाकाला पदर लावून बाजारात जाणाऱ्या या आजीबाईना स्वतः पी. आय. साहेबांनी मास्क लावला. एक संवेदनशील अधिकारी काय असतो हे त्यांच्या कृतीतून जाणवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here