विश्रामबाग पोलिसांची माणुसकी : जखमी डिलिव्हीरी बॉयला पोलिस गाडीतून नेले रुग्णालयात

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – फिट आल्यामुळे रस्त्यावर पडलेल्या झोमॅटो बॉयला विश्रामबाग पोलिसांनी गाडीतून रुग्णालयात दाखल करून माणुसकी जपली आहे. रविंद्र दिलीप गंभीरे (वय 35,रा. गोखलेनगर ) असे जखमी झालेल्या डिलीव्हरी बॉयचे नाव आहे. त्यांच्यावर डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून घरी सोडले. वेळीच मदत केल्यामुळे तरूणाच्या नातेवाईकांनी पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत केलेल्या मदतीचे आभार मानले आहेत.

बुधवारी रात्री दहाच्या सुमारास नारायण पेठ परिसरात एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय मोटारसायकल चालविताना पडल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विश्रामबाग पोलिसांना तत्काळ मार्शल पाठवून देण्यास सांगितले होते. त्यानुसार मार्शलनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत पडलेल्या तरूणाला पोलिस गाडीतून ओम साई हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

तेथील डॉक्टरांनी त्यांच्यार उपचार करून प्रकृती ठिक झाल्यानंतर एक तासांनी त्यांना घरी सोडून दिले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलिस नाईक राजेंद्र ढोरजकर , योगेश एकशिंगे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here