भोपाळ – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असून आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री चौहान यांनी ट्विट करुन दिली आहे.
मला कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. टेस्ट केल्यानंतर माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करुन घ्यावी तर माझ्या निकट संपर्कात आलेल्यांनी क्वारंटाईन व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी स्वतः क्वारंटाईन होत आहे. मी उपचार घेणार आहे. सर्वांनी सावधानता बाळगावी, असेही त्यांनी राज्यातील जनतेला उद्देशून म्हटले आहे.







