श्रीनगर – जम्मू- काश्मीरमधील रणबीरगढमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद ठार झाले आहेत. पोलिस आणि सुरक्षा दलाने ही कारवाई केली. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती नरेश मिश्रा आर्मी १० सेक्टर कमांडर यांनी दिली आहे.
श्रीनगर जवळील रणबीरगढमध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर हाती घेतलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान चकमक सुरु झाली. यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.







