पुणे (बाजीराव नाईक) – राज्यातील महिलांच्या हक्कासाठी लढणारी संस्था म्हणून पाहिली जाणाऱ्या बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजिच्या गोवा महिला संपर्कप्रमुखपदी प्रणिता बाळासाहेब शिंदे यांची संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय अध्यक्षा सौ मनिषा बाजीराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
प्रणिता बाळासाहेब शिंदे या थिवीम गोवा येथील राहिवासी असून, त्या नर्स म्हणून कार्यरत आहेत. नोकरी सांभाळून समाजसेवेच्या घेतलेल्या व्रताला त्यांनी एक वेगळं वलय प्राप्त करून दिले असून, महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो. राजकीय पक्ष, विविध संघटनांमध्ये त्यांनी अनेक पदे भूषविली आहे. कोरोना संकटकाळातही त्यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला असून, अन्नधान्य वाटपासह, लोकांची मोफत तपासणी व मास्क व सॅनिटायझर वाटप केले आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कोरोना रुग्णांची सेवा केली आहे. महिलांच्या उत्कर्षाप्रती त्यांची कणव पाहून बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक बिनविरोध निवड केली आहे .
प्रणिता शिंदे यांच्या माध्यमातून बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि. संपूर्ण गोवा राज्यात पार्टीचा विस्तार करणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Home Uncategorized बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजिच्या गोवा महिला...







