ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष जैन) – महाराष्ट्राचे कामगार नेते संजयभाऊ केणेकर, प्रदेश अध्यक्ष विजय सरोज, प्रदेश सरचिटणिस सत्यवानदादा गावडे, ठाणे प्रभारी संजयजी रणदिवे, प्रदेश जनसंपर्क प्रमुख ज्ञानेश्वर काकड,ठाणे सह प्रभारी उल्हास तावडे, जिल्हा अध्यक्ष सौ. सुषमा ठाकूर, शहर अध्यक्ष सौ. नताशा सोनकर यांच्या मार्गदर्शनाने “कामगार दिन सेवा सप्ताह” आम्ही भाजपा चित्रपट कामगार आघाडी ठाणे यांनी कामगारांना समर्पित केला.
या सेवा सप्ताहात मोठ्या प्रमाणात लसिकरण मोहीम पार पाडली, आणि याचा समारोप बांधकाम कामगारांना भाजी, ज्युस आणि सॅनिटायजर वाटून साधेपणाने साजरा केला .या कार्यक्रमात सॅनिटायजर मा. नगरसेवक व गट नेते श्री. मनोहरजी डुंबरे साहेब यांनी दिले त्यांचे मनापासून आभार मानले.
या कार्यक्रमाचे नियोजन सौ.नताशा सोनकर, अशोक पवारजी, हरिष जोशी, सुनिल साठे, शशांक परब, सुनिल नलावडे,वेदांत तिवारी या भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या कार्यकुशल पदाधिकारींनी केले. दिपक पटेल यांनी ही उपस्थिती लावली. कोवीड चे संकट टळो आणि चित्रपट कामगार, मजूर, कष्टकरी यांना सुखाचे दिवस येवो हि शुभेच्छा असे सौ. सुषमा ठाकूर ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष भाजपा चित्रपट कामगार आघाडी यांनी सांगितले.






