महाराष्ट्र पोलीस बॉइज असो.तर्फे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा गौरव सन्मानपत्र वाटप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र पोलीस बॉइज असोसिएशन तथा गृहरक्षक दल (होमगार्ड) संघर्ष समिती ,वैष्णवी धम्म फाऊंडेशन यांच्यामार्फत प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सिद्धार्थ डी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे आनंद आश्रमातील मुलांना धान्य ,कपडे ,पुस्तके सॅनिटायझर मार्क्स वाटप करून मुलांचे मेडिकल चेकअप सुद्धा करण्यात आले तसेच
अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ठाणे , मुंबई येथील क्वारंटाइन सेंटर येथे गृहरक्षक दलातील अधिकारी व होमगार्ड ,पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी , डॉक्टर, बीएमसी कर्मचारी , सफाई कर्मचारी यांना कोरोना योद्धा गौरव २०२० सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले त्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवेतील अधिकारी ,कर्मचारी यांनी सिद्धार्थ डी जाधव यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे हार्दिक आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here