जळगाव – जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.२५) प्राप्त झाल्यानंतर, आज नव्याने 268 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 9451 झाली आहे. सर्वाधिक 78 कोरोना बाधित हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 10 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि दिवसभरात 209 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात शनिवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 78, जळगाव ग्रामीण 22, भुसावळ 20, अमळनेर 8, चोपडा 42, पाचोरा 7, भडगाव 19, धरणगाव 7, यावल 8, जामनेर 8, रावेर 15, पारोळा 2, चाळीसगाव 23, मुक्ताईनगर 6, बोदवड 2 व इतर जिल्ह्यातील 1 अशी रूग्ण संख्या आहे. शनिवारी दिवसभरात 10 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जामनेर तालुक्यातील 3, जळगाव तालुक्यातील 2 तर एरंडोल, यावल, रावेर ,धरणगाव, मुक्ताईनगर येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांचा आकडा 460 वर जावून पोहचला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.







