डी.एन.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३६ विद्यार्थ्यांची मॅग्नेटी मॅरेली मदरसन ऑटो सिस्टीम लिमिटेडकरिता निवड

शहादा (विजय पाटील) – मॅग्नेटी मॅरेली मदरसन ऑटो सिस्टीम लिमिटेड, अहमदाबाद येथे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय शहादाच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल आणि इन्स्ट्रुमेंटशन विभागाच्या 36 विद्यार्थ्यांची निवड झाली.
दि. 26 जुलै 2020 रोजी सर्व विद्यार्थी अहमदाबाद येथे रवाना होतील व दि. 28 जुलै ला कंपनीत रुजु होणार आहेत. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दिपकभाई पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील,सचिव श्रीमती कमलताई पाटील,समन्वयक प्रा.मकरंद पाटील,श्री. पी. आर.पाटील, प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.ट्रेंनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. आर.एस.पाटील, अकॅडेमिक डीन डॉ. डी. एम. पटेल, प्रा. हेमंत पाटील आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here