मुंबई (जॉनी वाझ) – बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन कोरोनाने संक्रमित आहेत. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. बिग बी रुग्णालयातदेखील सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत. आपल्या आरोग्याचे अपडेट्स या माध्यमातून देत आहेत. ते फॅन्सचे आभारदेखील व्यक्त करत आहेत. तसेच रोज पोस्ट शेअर करून लोकांना मोटिवेटदेखील करतात. नुकताच त्यांनी आपले घर जलसाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी जलसाचा एक जुना फोटो शेअर केला आहे. यामध्ये ते फॅन्सना अभिवादन करताना दिसत आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हाथ जो आप प्यार और समर्थन में उठाते हैं, वे मेरी ताकत हैं.. यह मैं कभी भी अपने सिस्टम से गायब नहीं होने दूंगा… इसलिए भगवान मेरी मदद करें!”
बिग बींनी पुढे लिहिलयं की, “हे जलसाचे फाटक आज सील आहे, निर्मनुष्य आहे. परंतु, अपेक्षांवर कायम आहे. परमेश्वराची इच्छा आहे की, ते पुन्हा प्रेमाने भरावे.” कोरोना काळाच्या आधी रविवारी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर फॅन्सची त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायची. फॅन्सना आपली झलक दाखवण्यासाठी ते घराबाहेर पडून फॅन्सना अभिवादन करायचे.







