कानपूर एसपींसह तब्बल १५ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

लखनऊ (सय्यद गुलाम हुसैन) – उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून गुंडांचा अक्षरश: नंगानाच सुरु आहे. पोलिसांच्या भूमिकाही अत्यंत वादग्रस्त ठरल्या आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात वरिष्ठ १५ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. कानपर एसएसपी दिनेश कुमार यांचीही गच्छंती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता प्रितींदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील माफिया विकास दुबेने कानपूरमध्ये आठ पोलिसांची दिवसाढवळ्या हत्या केल्याने पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. त्यानंतर विकास दुबेचा एन्काउंटर केला. तथापि केलेल्या एन्काउंटरवरूनही पोलिसांची नाचक्की झाली. त्यामुळे आज झालेल्या तडकाफडकी बदल्यांमध्ये कानपूर एसपींचाही समावेश आहे.
अलीकडेच अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले पत्रकार विक्रम जोशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पत्रकार विक्रम जोशी यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या होत्या. उत्तर प्रदेशातील गाजियाबादमधील विजय नगर येथील घराजवळ सोमवारी (दि.२०) ही घटना घडली होती. त्यांनी आज उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here