सिध्दिविनायकाच्या चरणी व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक मदतीची गरज

मुंबई (सुदर्शन सुर्वे) (दादर श्री सिद्दीविनायक मंदिर) – कोरोनाविरोधातील लढाईने अनेकांच्या जीवनात बदल झाले आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे सिध्दीविनायकाच्या चरणी व्यवसाय करणाऱ्या हार, फुल, प्रसाद विक्रेत्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सिध्दिविनायक मंदिराच्या बाहेर असलेल्या जवळपास १०० दुकानांतील आर्थिक व्यवहार या लॉकडाऊनमध्ये थंडावल्यानवे, यावर अवलंबून असलेली दीड हजार कुटुंबाना दिलासा देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.
सिध्दिविनायक मंदिराच्या परिसरात हारे, फुले, मिठाई अशी प्रसाद व पूजा विक्रीची अनेक दुकाने आहेत. या भागात जवळपास १०० दुकाने आहेत. या दुकानांचे एका दिवसाचे उत्पन्न पाच ते दहा हजार एवढे आहे. उत्सवाच्या दिवशी हे उत्पन्न दिवसाला पंधरा हजारदेखील होते. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असल्याने, या दुकान मालक व त्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
दरम्यान दुकाने बंद असली तरी बेस्टने या दुकानमालकांना वीज बिले पाठविली असून, यामध्ये एका महिन्याचे बिल साधारणतः ४ हजार रुपये याप्रमाणे पाच महिन्यांचे २० हजार रुपये वीज बिल आले आहे. दुकान बंद असेल, व्यवसाय होत नसेल तरी एवढे मोठे वीज बिल भरायचे कसे? असा दुकानदारांना प्रश्न पडला असून, आता या सर्वांना सरकारच्या आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास अध्यक्ष
आदेशजी बांदेकर यांनी लक्ष देण्याची मागणी

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते आदेश बांदेकर यांची श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी पुर्ननियुक्ती करण्यात आली आहे. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या या पदावर पुर्ननियुक्ती झाल्याबद्दल श्री.बांदेकर यांचे या दुकानमालक व कामगारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. श्री.बांदेकर यांनी व्यावसायिकांच्या प्रश्नी लक्ष घालून, लवकरात लवकर आर्थिक मदत वा मंदिर सुरु होऊन, व्यवसाय सुरु होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, अशी मागणी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here