मुंबईत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

मुंबई (हितेश मिस्त्री) – मध्य मुंबईतील धारावी परिसरात एका आठ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २५ वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.
धारावी येथील महात्मा गांधी मार्गावरील गणपती पाडा चाळीमध्ये गुरुवारी ही घटना घडली. घराजवळ खेळणाऱ्या मुलाला हा तरुण पैसे आणि खेळणी देण्याचे आमिष दाखवून निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला. आजुबाजूला कुणी नसल्याचे पाहून त्याने या मुलावर लैंगिक अत्याचार केला. याचवेळी परिचयातील एक मुलगा या ठिकाणी आल्याने तरुणाने पळ काढला. मुलाला त्रास होऊ लागल्याने त्याने आईला सर्व हकिकत सांगितली. मुलाच्या पालकांनी थेट पोलिस ठाणे गाठत या तरुणाविरुद्ध तक्रार केली. या नराधमाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here