रशियातील शाळेत गोळीबार; 11 जणांनी गमावला जीव

मॉस्को – नैऋत्य रशियातील एका शाळेत गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये आतापर्यंत 11जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांचीही समावेश आहे. वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, कझान शहरातील शाळेमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले. तसंच शाळेतून अल्पवयीन बंदुकधाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये घटनेनंतर शाळेच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं दिसत आहे. शाळेच्या परिसरात अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. तसंच पोलिस आणि लष्करी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

शाळेजवळ बचावकार्य सुरु असून 21 रुग्णवाहिका दाखल झाल्या असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. इंटरफॅक्स न्यूज एजन्सीने सूत्रांच्या मदतीने अशी माहिती दिली की, दोन हल्लेखोर असण्याची शक्यता असून त्यापैकी एकजण आत असू शकतो. शाळेत हल्ला करण्याआधी मोठा स्फोट झाला. त्यानंतर काही विद्यार्थी उड्या मारून बाहेर पडल्याने बचावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here