अखेर सचिन वाझे बडतर्फ; मुंबई पोलिस आयुक्तांनी विशेषाधिकार वापरला

मुंबई – मुंबईत सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेला सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी विशेषाधिकार वापरून हा निर्णय घेतला आहे.

सचिन वाझे याची कारकीर्द कायमच वादग्रस्त राहिली आहे. त्याच्यावर याआधी दोन वेळा निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र करोना काळात पोलिसांवर ताण आला असून अतिरिक्त अधिकाऱ्यांची गरज असल्याचं सांगत सचिन वाझेला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले होते.

मुंबईतील हायप्रोफाइल भागात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे याचे नाव आले. त्यानंतर मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि याप्रकरणातही सचिन वाझे याच्याकडेच संशयाचं बोट गेलं. तसंच सचिन वाझे यानेच मनसुख हिरेन यांची हत्या केली आहे, असा दावा नंतरच्या काळात महाराष्ट्र एटीएसने केला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सचिन वाझे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आज मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी विशेषाधिकार वापरत सचिन वाझे याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here