भोपाळ – मध्य प्रदेशचे ज्येष्ठ पत्रकार शिव अनुराग पटेरिया यांचे बुधवारी निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते.
इंदोर येथील एका खासगी रुग्णालयात पटेरिया यांनी अंतिम श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. पटेरिया गेल्या ४० वर्षांपासून पत्रकारितेशी जुळले होते.
त्यांनी वार्ताहर म्हणून १९७८मध्ये छत्तरपूर येथून पत्रकारितेला सुरुवात केली. राज्याच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी आपली सेवा दिली. ते बऱ्याच काळापासून लोकमत समूहाशी जुळलेले होते. एक सजग व निडर पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती.






