महिला सहायक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की, बाप-लेकीला अटक

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कोरोनाच्या काळातही शहरात नागरिक बिनधास्त फिरत असतानाच नाका-बंदी दरम्यान पोलिसांशी वाद घालत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. खडकी भागात मास्क न घालणाऱ्या दोघांनी कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.

अँथोनी सेबस्टिसन डिलीमा (वय 69, रा. सोपानबाग, घोरपडी) व अलिशा अँथोनी डिलीमा (वय 32) यांना अटक केली आहे. याप्रकरणी विद्या पोखरकर (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या खडकी पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. बुधवारी रात्रीच्या सुमारास त्या बोपोडी येथील आंबेडकर चौकात नाका बंदीचे कर्तव्य पार पाडत होत्या. त्यावेळी दोन्ही आरोपी दुचाकीवरून जात होते. यावेळी पाठीमागे बसलेल्या अलीशा हिने मास्क घातला नव्हता. यामुळे पोखरकर यांनी त्यांना दुचाकी थांबवण्याचा इशारा केला. पण त्याने दुचाकी त्यांच्या अंगावर घातली.

फिर्यादी यावेळी बाजूला झाल्याने बचवल्या. यानंतर पोखरकर यांनी मास्कबाबत विचारणा केली. तर त्यांना ‘तू कोण मास्क विचारणारी, तुझी नोकरी घालवते’ असे बोलून इतर कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अधिक तपास खडकी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here