पुणे महानगरपालिकेत नोकरीच्या आमिषाने महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून तरूणींना गंडा

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागात लिपीक म्हणून कामाला लावण्याची बतावणी करून पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्याने तरूणींना गंडा घातला आहे. तब्बल साडेचार लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

आदिती उर्फ विद्या दीपक साळवे (रा. खडकी बाजार नेमणूक-हडपसर पोलीस ठाणे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. सुवर्णा येनपुरे (वय 28, रा. पौड रस्ता, कोथरूड) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदिती उर्फ विद्या हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी 2018 मध्ये सुवर्णा आणि त्यांच्या बहिणीसह आदिती जाधव यांना पुणे महानगर पालिकेतील आरोग्य विभागात लिपीक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते.

त्यानुसार आदितीने सुवर्णा यांच्याकडून 7 लाख 50 हजार रूपये घेतले. मात्र, नोकरी लावली नाही. त्यानंतर सुवर्णा यांनी वारंवार तगादा लावल्यानंतर आदितीने 3 लाख रूपये सुवर्णाला माघारी दिले. उर्वरित 4 लाख 50 हजारांची रक्कम माघारी न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सहायक पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी फोनला उत्तर दिले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here