27 जूनला होणारी परीक्षा आता 10 ऑक्टोबरला
नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडली आहे. 27 जून रोजी ही परीक्षा होणार होती. पण आता ही परीक्षा 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील वेगवेगळ्या परीक्षा लांबणीवर पडत आहेत. त्यामध्ये आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचीही भर पडली आहे. ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार, 27 जून रोजी घेतली जाणार होती. आधीच युपीएससीच्या नियोजित वेळापत्रकानुसार आधीच या परीक्षेला उशीर झाला होता.
अशातच आता पुन्हा एकदा कोरोनामुळे ही परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आली आहे. तसेच युपीएससीनं 10 ऑक्टोबर ही नवी तारीख जाहीर केली आहे.






