पुणे (अजय पवार) – पुण्यात शनिवारी दिवसभरात 2600 नवे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी पुणे शहरात 1521 तर पिंपरी चिंचवडच्या 1079 रुग्णांचा समावेश आहे. त्याप्रमाणेच पुणे शहरात 20 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 16 अशा एकूण 36 मृत्यूची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरातील रुग्णवाढीचा वेग लॉकडाउनमुळे थोडा घसरल्याचे दिसून येत आहे.
पुणे शहरात शनिवारी ’आरटीपीसीआर’ व अँटिजेंन चाचणीसाठी 6090 संशयितांचे नमूने घेण्यात आले. तर आतापर्यंत दोन्ही मिळून 2 लाख 41 हजार 541 नमुने घेण्यात आले आहेत. याआधी घेतलेल्या नमुन्यांपैकी 1521 नमुने आज तर, आतापर्यंत 47,065 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. याचबरोबर दिवसभरात 693 तर आतापर्यंत 27418 कोरोनातून बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 18,494 सक्रिय रुग्णांवर (अॅक्टिव्ह) असून ते उपचार घेत आहेत. त्यापैकी 673 रुग्ण गंभीर तर 115 रुग्ण अत्यवस्थ असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. गंभीर व अत्यवस्थ रूग्णांची संख्यादेखील झपाटयाने वाढत आहे.
उपचारादरम्यान शनिवारी पुणे शहरात 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यापैकी 13 पुरूष तर 7 महिला आहेत. या मृतांचे वय 36 ते 80 च्या दरम्यान होते. हे रुग्ण फुरसूंगीतील दोन, आंबेगाव बुद्रुक, आनंदनगर सिंहगड रोड, हडपसर, खराडी, कसबा पेठ, औंध कोथरूड, वडगाव, मार्केटयार्ड, मंंगळवार पेठ, नवी पेठ, धनकवडी, कोरेगाव पार्क, कात्रज, वडगावशेरी आणि गुरूवार पेठ येथील रहिवाशी होते. त्यापैकी जवळपास सर्वांना न्युमोनिया, उच्च रक्तदाब, मधुमेह असे जोखमीचे आजार होते. आतापर्यंत शहरातील एकूण मृतांची संख्या 1153 वर पोचली.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे 1,079 नवे रूग्ण आढळले असून एकूण संख्या 15,632 झाली आहे. आता सक्रिय 3,563 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 5,217 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच कोरोनातून बरे झालेल्या 571 जणांना घरी सोडण्यात आले आणि 513 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. मृत्यू पावलेले रुग्ण पिंपळे गुरव (पुरुष -70) संत तुकाराम नगर पिंपरी (पुरुष- 56) पिंपरी ( स्त्री- 64 , पुरुष -80) चिंचवड ( पुरुष -38, 74 , 95 ) दापोडी ( पुरुष- 45) नेहरुनगर ( पुरुष -75) च-होली ( पुरुष -67) मोहनगर ( पुरुष- 67) म्हाळुंगे ( पुरुष- 38) विश्रांतवाडी (स्त्री- 72) बालेवाडी (पुरुष -85) मुळशी (पुरुष -68) हिंजवडी (स्त्री- 84) येथील रहिवाशी असून त्यांची संख्या 16 आहे.







