जाणिव ट्रस्टतर्फे रुग्णसेवेकरिता १२ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

धरणगाव (योगेश पी पाटील) –  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते बीकेसी येथे खा.अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली जाणिव ट्रस्टतर्फे दक्षिण मुंबईमधील रुग्णांच्या सेवेकरिता १२ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
राज्यात उद्‌भवलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा १२ रुग्णवाहिकांचा ताफा नागरिकांच्या सोईसाठी देणयात आला असून, मुंबईतील रुग्णांसाठी मंत्री अनिल परब यांच्या सौजन्याने मुंबईतील १२ विभागांना प्रत्येकी १ याप्रमाणे १२ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अनिल परब, खा.अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर, आ.सुनिल प्रभू आदी उपस्थित होते.
मुंबईतील रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका दिल्याबद्दल खा.अरविंद सावंत यांचे गुलाबराव वाघ शिवसेना जिल्हा प्रमुख, जळगांव, पी एम पाटील उपजिल्हा प्रमुख, गजानन पाटील तालुका प्रमुख, राजेंद्र महाजन शहरप्रमुख, निलेश चौधरी लोकनियुक्त नगराध्यक्ष धरणगाव यांनी आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here