कोरोनाग्रस्त पित्याला ऑक्सिजन देण्यासाठी मुलीकडे केली सेक्सची मागणी

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – घरातल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यावर सर्वत्र चिंतेचं आणि तणावाचं वातावरण तयार होतं. या काळात काय करावं सुचत नाही. या संकट काळात काही लोक धावून येतात. पण काही लोक भितीपोटी मदत करण्यास तयार होत नाहीत. आता कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने सेक्सची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराविरोधात सोशल मीडियात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

एक पीडित मुलगी आपल्या कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजनचा शोध घेत होती. अनेक ठिकाणी चौकशी करून देखील मुलीला ऑक्सिजन मिळाला नाही. त्यानंतर मुलीने तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडे ऑक्सिजनची मागणी केली. त्यानंतर त्या नराधमानं मुलीकडे ऑक्सिजन सिलिंडर्सच्या बदल्यात सेक्सची मागणी केली. त्यानंतर त्या मुलीनं ही गोष्ट आपल्या मैत्रिणीला सांगितली.

या प्रकाराबाबत एका तरुणीने सोशल मीडियातून वाचा फोडली आहे. त्यानंतर तिने यासंदर्भात पोस्ट करताच सोशल मीडियातील हजारो तरुण-तरुणींनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. भावरीन कंधारी नावाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रश्न उचलून धरला आहे. त्यांनी ट्विटरवर #HumanityIsDead अशी मोहिम चालवली आहे. तसेच नराधमाला कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी अनेकांनी केली आहे.

दरम्यान, कोरोनाकाळात अनेकांनी गरजू लोकांना मदत केली आहे. तर अनेक लोकांनी लोकांच्या मदतीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे. व्यक्तीच्या गरजेचा फायदा घेणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here