रेमडेसिवीर इंजेक्शनचा राग कोरियोग्राफर रेमो डिसूझावर निघाला; व्हायरल झालेला व्हिडीओ पहा

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – बॉलीवूडचा प्रसिद्ध डान्स कोरियोग्राफर आणि निर्माता रेमो डिसूझाला मोठा धक्का बसला आहे. काहीही संबंध नसताना एका तरुणाने कोरोना संकटाचा राग त्याच्यावर काढला आहे. खुद्द रेमो डिसुझानेच त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रेमोने इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. यामुळे रेमोवर राग काढणारा तरुणही खूप फेमस होऊ लागला आहे. झाले असे, या व्हिडीओमध्ये एक तरुण कोरोनासाठी वापरले जाणारे इंजेक्शन आणि लाचखोरीवर बोलत होता. यावेळी त्याने रागाने रेमो डिसुझाचे नाव घेतले. खरेतर त्याला रेमडेसीवीर इंजेक्शनचे नाव घ्यायचे होते.

तुम्ही या आधीही सोशल मीडियावर या तरुणाचे स्थानिक प्रसार माध्यमांना बाईट देणारे, मोदींविरोधात बोलणारे व्हिडीओ पाहिले असतील. हा तरुण 500 रुपयांची लाचखोरी आणि रेमेसीवीर इंजेक्शनवर बोलत होता. यावेळी त्याने 500 रुपये तर आपल्या देशाचे अधिकारी लाच म्हणून खातात. सिप्ला कंपनीचे जे इंजेक्शन येतेय, ‘रेमो डिसुझा’ येतेय, त्याची किंमत 5000 रुपये आहे, आणि तुम्ही 500 रुपयांत देत आहात, असे तो म्हणाला.

दरम्यान, ही बाब तिथे उपस्थित कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, सोशल मीडियाने तो तरुण बोलताना चुकला हे लगेचच पकडले. हा व्हिडीओ रेमो डिसुझापर्यंत देखील पोहोचला आणि त्याला हसूही आवरले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here