अनोरे येथे मराठा प्रतिष्ठान तर्फे स्वराज्याचा धाकला धनीस मानाचा मुजरा

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – महापराक्रमी,बहुभाषांचे जाणकार,रणधुरंधर,शाक्तवीर, प्रचंड विद्वान,राजनीती चतुर, स्वराज्याचे धाकले धनी, स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यासाठी अतोनात संघर्ष सहन करणारा, एकही पराभव न झालेला, मृत्यूशी झुंज देत असतांना मरणाला ही अश्रूंचा पाझर फुटावा असा महान कर्तृत्ववान राजा म्हणजेच शंभूछत्रपती यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनोरे ता. धरणगाव येथे अभिवादन करण्यात आले.

त्याप्रसंगी गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, महेश पाटील, नितीन पाटील, हर्षल पाटील, कल्पेश पाटील, अमोल पाटील, समाधान पाटील तसेच मराठा प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते आणि पत्रकार मंगेश पाटील सर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here