ईदच्या दिवशी नमाजावेळी काबूलमधील मशिदीत बॉम्बस्फोट; १२ ठार

काबूल – अफगाणिस्तानची राजधानी काबूल ईदच्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटाने हादरली आहे. उत्तर काबूलमधील एका मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात १२ जण ठार झाले आहेत. या स्फोटात मशिदीचे इमामही ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर, १५ हून अधिकजण जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच तालिबानने शस्त्रसंधी जाहीर केली होती. काबूल प्रांतामधील शाकर दारा जिल्ह्यातील मशिदीत हा स्फोट झाला.

गुरुवारपासून तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार दरम्यान चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर बॉम्बस्फोटाची ही पहिलीच घटना आहे. मागील दोन दशकांपासून अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा हिंसाचार सुरू आहे. ईद-अल-फितरच्या निमित्ताने तीन दिवस तालिबानने शस्त्रसंधी जाहीर केली.

अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आपले उर्वरित २५०० सैन्य माघारी घेण्याचे जाहीर केल्यानंतर दहशतवादी हल्ल्यात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एका शाळेच्या बाहेर भीषण स्फोट झाला होता. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही. मशिदीमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here