गाझा पट्टीतील असोसिएटेड प्रेस आणि अल-जजीरा चॅनलचे कार्यालय असलेली इमारत उद्धवस्त

गाझा – इस्त्रायली हवाई हल्ल्यात गाझा पट्टीवरील एक उंच इमारत उद्ध्वस्त झाली आहे. या इमारतीत असोसिएटेड प्रेस आणि अल-जजीरा सारख्या माध्यमांची कार्यालये होती. एपीच्या म्हणण्यानुसार, इस्त्रायली सैन्याच्या इशार्‍यानंतर त्यांनी ही इमारत रिकामी करण्यास सांगितल्यानंतर हा हवाई हल्ला करण्यात आला.

यापूर्वी शनिवारी पहाटे गाझा शहरात इस्त्रायली हवाई हल्ल्यात कमीतकमी 10 पॅलेस्टाईन ठार झाले. यातील बहुतेक मुले होती. गाझाच्या अतिरेकी हमासच्या राज्यकर्त्यांनी युद्ध सुरू केल्यापासून इस्त्रायली हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांची ही संख्या सर्वाधिक आहे.

याआधी शनिवारी गाझा शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या निर्वासितांच्या छावणीवर इस्त्रायलने हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 10 जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

पॅलेस्टाईन मधील दहशतवादी गट असलेल्या हमासकडून इस्रायल वर गेल्या पाच-सहा दिवसात हजारो रॉकेट हल्ले करण्यात आले आहेत. त्यामध्ये शेकडो नागरिक जखमी झाल्याचा दावा इस्रायलने केला असून आता हमासला जशास-तसं उत्तर दिलं आहे. इस्रायलनेही गाझा पट्टीवर प्रतिहल्ला करुन हमासच्या 11 कमांडरना मारल्यांचं वृत्त आहे. इस्रायलच्या या हल्ल्यात 70 पॅलेस्टिनी नागरिकांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे आता पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या तीन दिवसांपूर्वी जेरुसलेम तीन मोठ्या स्फोटांनी हादरलं होतं. जेरुसलेमच्या वेस्ट वॉलजवळ ज्यू धर्मीय प्रार्थना करत असताना हमासकडून रॉकेट हल्ला करण्यात आला. त्यामध्ये नऊ मुलांसह 20 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी होती. जेरुसलेम मधील अल-अक्सा मशिदीजवळ इस्रायल पोलीस आँणि पॅले्स्टिनी नागरिकांच्यात झटापट झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here