डॉ शुभम भोलाणे यांचा धरणगावी सत्कार

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथील रहिवासी खर्दे माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन ॲड वसंतराव भोलाणे यांचे चिरंजीव डॉ शुभम भोलाणे एम बी एस उतीर्ण झाले असून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला असून त्या बद्दल त्यांचा धरणगाव येथे पी एम पाटील सर मित्र परिवार व जय भवानी मित्र मंडळ लांडगे गल्ली तर्फे त्यांचा निवास स्थानी जाऊन सत्कार केला.

डॉ शुभम भोलाणे यांनी सांगितले जास्तीत जास्त गरीब व होतकरू व त्यांना कोणाचा आधार नसेल अश्या रुग्णांची सेवा करणे मला पसंत असून धरणगावातील व परिसरातील जास्त जनतेची सेवा करण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाचे नगराध्यक्षपदाचे प्रथम मानकरी श्री पी एम पाटील सर यांनी त्यांचा बुके देऊन सत्कार केला या प्रसंगी ॲड वसंतराव भोलाणे,उघोगपति दिनेश कंखरे, शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र जाधव,नगरसेवक नंदू पाटील,युवासेनेचे कमलेश बोरसे,पत्रकार योगेश पी.पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here