जनजागृती सेवा समितीच्यावतीने “विशेष सन्मानपत्र “देऊन सत्कार
बदलापुर (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – खान्देश मराठा पाटील मंडळाचे उपाध्यक्ष व प्रामाणिक रिक्षा चालक सुरेश पाटील यांचे चिरंजीव देवानंद पाटील टाटा स्टील जमशेदपूर येथे इंजिनिअर म्हणुन नोकरी करत आहेत. नोकरी करत असताना त्यांनी बऱ्याच परिक्षा दिल्या. त्यातीलच इस्त्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिचर्स संस्थेची परिक्षा पास होऊन देवानंद पाटील यांची इस्त्रो मध्ये ज्युनियर सांयटिस्ट म्हणुन निवड झालेली आहे.त्यामुळे बदलापुरचे नाव सातासमुद्रा पार गेलेल आहे.त्यांचे कौतुक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी “जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेकडुन समितीचे पदाधिकारी दिपक वायंगणकर,एकनाथ गायकर,तसेच मंत्रालयातील सेवा निवृत्त अधिकारी जेष्ठ सल्लागार दिलीप नारकर,सिटीझन वेलफेअर असोशिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष सुनिल दळवी,सेक्रेटरी राजेंद्र नरसाळे, टीटवाळा उद्योजक फोरमचे अध्यक्ष मानसोपचार तज्ञ, व्यसनमुक्ती आणि पेरेटींग कोच डाॅ.अमितकुमार गोविलकर,शिवसेना विभाग प्रमुख,बुलढाणा संघटक विलास हंकारे, डाॅ.निता पाटील फाऊंडेशनच्या अध्यक्षा डाॅ.निता पाटील,हिंदु महासभा महाराष्ट्र प्रदेश संघटनक सुवर्णा इस्वलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “विशेष सन्मानपत्र “देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.शब्दांकन डाॅ.प्रल्हाद देशपांडे यांनी केले.सर्व प्रमुख पाहुण्यांनी देवानंद पाटील याच्या सन्मानार्थ त्यांच्या खडतर वाटचालीचा , त्यांच्या कुटुंबियांच्या सहभागा संदर्भात यथोचित गौरवोद्गार काढत त्यांचें मनःपुर्वक अभिनंदन करून त्यांना सिनियर सांयटिस्ट होण्यासाठी, तसेच विज्ञान क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी समितीच्या सचिव संचिता भंडारी व खजिनदार दत्ता कडुलकर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य एकनाथ गायकर यांनी केले. व आभार सदस्य दीपक वांयगणकर यांनी मानले.देवानंद पाटील याच्या यशस्वी उड्डाणाबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.






