प्रवरा कोविड सेंटरला दानशूरांची मदत

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – प्रवरा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मदतीकरीता साखर कामगार सभा शाखा प्रवरा नगर आणि कामगार युनियनच्या वतीने २ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.

याप्रसंगी कामगार युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, कामगार सोसायटीचे अध्यक्ष निवृती तांबे, कामगार संचालक पोपट वाणी, दिलीप कडू आदी उपस्थित होते. शिर्डी येथील साईश विनोद गोंदकर यांनी नीड फाॅर निधीच्या माध्यमातून कोव्हीड सेंटर करीता औषधांची उपलब्धता करुन दिली. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यानी ५० हजार रुपयांचा धनादेश आ.विखे यांच्याकडे दिला.

need-for-needy

लोणी येथील मराठा उद्योजक लॉबी प्रवरा परीसराच्या वतीने ७१ हजार आणि दिपक रोहोम यांनी ५१ हजार रुपयांची मदत कोव्हीड सेंटर करीता दिली आहे. सदर रुग्णालयाला विविध क्षेत्रांतून मदतीचा ओघ हा सातत्याने सुरूच असून लवकरच येथील रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी होतील असे चित्र सध्या रुग्णालयात पाहायला मिळत आहे. याप्रसंगी शिर्डी नगरपंचायत चे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, प्राचार्य डॉ प्रदीप दिघे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here