लॉकडाऊनमुळे मराठी चित्रपटातील अप्सरा सोनाली कुलकर्णीने केले दुबईत शुभमंगल

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – नटरंग चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या प्रसिद्ध लावणी गीतावर अदाकारी पेश करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कुणाला माहिती नाही.

sonali-kulkarni-marriage

तिच्या ठसकेबाज नृत्याने अवघ्या महाराष्ट्राला मोहिनी घातली. रातोरात चंदेरी दुनियेची खरीखुरी ‘अप्सरा’ झाली. आता त्या सोनालीने कुणाल बेनोडेकर सोबत आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली आहे. तिने काल (दि.१८) कुणालशी लग्न गाठ बांधत आपल्या लग्न सोहळ्याचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत.

https://www.facebook.com/sonalee1/posts/341256050691062

सोनाली कुलकर्णीचा आज (दि.१८) वाढदिवस आहे. या खास दिवसाचे औचित्य साधून तिने दुबईत लग्न केल्याचे जाहीर केले आहे. ७ मे रोजी दोघांनी दुबईतील एका मंदिरात लग्न केले आहे.

sonali-kulkarni-online-marriage

या सोहळ्याला अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पाहुणे उपस्थितीत होते. या आनंदमयी सोहळ्याला मात्र सोनालीचे आई-वडील आणि कुणालचे आई-वडीलही अनुपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी आपल्या मुलांच्या लग्नाला हजेरी लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here