जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शहरात वेगाने वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या व उपचारांसाठी अपुऱ्या पडत असलेल्या
रुग्णालय व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर भरारी फाउंडेशनतर्फे छत्रपती संभाजी महाराज नाट्य संकुलात ५० बेड्स चे सी सी सी सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये महिला व पुरुष अशी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. संशयित रुग्णांसाठीचे विलगीकरण कक्ष कमी पडत आहेत. या कक्षात लक्षणे नसणार्या पण कोरोना बाधित असलेल्या रुग्णांसाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. औषधोपचार, उत्तम प्रतीचे भोजन, मनोरंजन, योगा, समुपदेशन या सेवा याठिकाणी देण्यात येणार आहेत. तसेच याठिकाणी तज्ञ डॉक्टर नर्सेस, वॉर्डबॉय व रुग्णवाहिका यांची नियुक्ती करण्यात आली असून सी सी टिव्ही व सुरक्षा रक्षकांच्या निगराणीत सेंटर आहे.
यासाठी अमूल्य सहकार्य म्हणून केशवसमूर्ती प्रतिष्ठानने जागा उपलब्ध करून दिली आहे.
उद्योगपती रजनीकांतजी कोठारी, ,भरतदादा अमळकर, सुशीलजी नवाल, अनिषभाई शहा, अनिलजी भोकरे नंदूशेठ आडवाणी सभापती सुचिताताई हाडा, ,डॉ.राधेश्याम चौधरी, सपनजी झुनझुनवाला, डॉ.रितेश पाटील , नरेशजी खंडेलवाल, रवींद्रजी लढा, आदेशजी ललवाणी यांनी अमूल्य सहकार्य केले आहे.
सचिन महाजन देवराज बोरसे मोहित पाटील आकाश भावसार रितेश लिमडा हे भरारीचे स्वयंसेवक सेंटरला पूर्ण वेळ सेवा देणार आहेत.असे दीपक परदेशी यांनी सांगितले.







