
बेलापूर (सी बी डी) (महेश खैरनार) – वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत प्रकाशित झाली आहे.
ही मुलाखत सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावी, ज्यातून शिवसेना व महाराष्ट्र सरकारची स्पष्ट भूमिका सर्वांपर्यंत जाईल यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख महेश खैरनार, उप शहर प्रमुख सुनील पनीकर, शिवसेना उत्तर भारतीय विभाग उप जिला संघटक हेमंत जायसवाल शिवसेना ऑटोरिक्शा चालक मालक सेना अध्यक्ष चन्द्रकांत पाटिल व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे हस्ते पोलिस अधिकारी, वकील, वयोवृध्द नागरिक, प्राध्यापक, भाजी विक्रेते, कामगार व तरुण यांना सामनाचा अंक वितरीत करण्यात आला.








