छत्रपती उदयनराजे भोसले खासदार झाल्याबद्दल राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेलतर्फे खारघर (फणसवाडी ) येथे अन्नदान व लाडूंचे वाटप

पनवेल (विशेष प्रतिनिधी) – राज्यसभेच्या नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी बुधवारी दिल्लीत पार पडला. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील यावेळी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. छत्रपती उदयनराजे भोसले यांची राज्यसभेच्या खासदारपदी शपथ घेतल्याने व केंद्रीय रेल्वे मंत्रालय सदस्यपदी निवड झाल्याने उदयनराजे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी देखील मी समाजसाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले असून प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेतली व केंद्रीय रेल्वे मंत्रालय सदस्यपदी निवड झाली. त्यानिमित्ताने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक व पनवेल शाखेतर्फे खारघर येथील फणसवाडी या आदिवासी वस्तीतील गोर – गरीब आदिवासी नागरीकांना अन्नदान करण्यात आले व गोडधोड म्हणून लाडूंचे देखील वाटप करण्यात आले.

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून रविवारी दिनांक २६ जुलै २०२० रोजी खारघर येथील फणसवाडी या आदिवासी वाडीमधील नागरिकांना अन्नदान व लाडूंचे वाटप करण्यात आले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, राजपाल शेगोकार, गौरव भेंडे, ओमकार महाडिक, अमित पंडित, मनोज चव्हाण आदी उपस्थित होते. या अन्नदान उपक्रमास गणेशजी कडू, राकेश मोरे, विजयकुमार जोशी, फणसवाडी येथील रहिवाशी कुणाल पाटील व फणसवाडी येथील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले त्याबद्दल तालुकाध्यक्ष संतोष आमले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here