धरणगाव (योगेश पी.पाटील) – महाराष्ट्राचे कर्तुत्ववान मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त धरणगाव ग्रामीण मधील लक्ष्मी नगर येथे वृक्षारोपण गणेश नगर,पद्मालय नगर,साहिल नगर,हेमइंदु नगर,पदमालय नगर,साईबाबा नगर,जी एस नगर,मातोश्री नगर या ठिकाणी आर्सेनिक अल्बन 30, ह्या कोरोना विषाणू वर मात करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गोळ्याचे वाटप व आपल्या सुरक्षेसाठी मास्क वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना. गुलाबरावजी पाटील सो यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे नियोजन सकाळी ठीक 10 वाजता लक्ष्मी नगर येथे आयोजित करण्यात आले आहे. विलास भाऊ महाजन हे जरी शिवसेना युवा नेते असले तरी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल गोरगरीब कार्यकर्ता असेल त्यांच्या मदती साठी सदैव तत्पर असा कार्यकर्ता आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,न.पा.गटनेते पप्पू भाऊ भावे,मा.प्रभारी नगराध्यक्ष विजय भाऊ महाजन,वासुदेव भाऊ चौधरी यांचा नेतृत्वाखाली तयार झालेल्या एक कार्यकर्ता असून कोणतेही काम असेल कधीही आपण कोणत्या पदावर आहोत याच्या विचार न करता पक्षाचे नेते असतील आम नागरिक असेल दिवस असोकी रात्र फोन केला म्हणजे हजर त्यांच्या या कामाची पावती म्हणून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी त्याच्या धर्मपत्नी कल्पना ताई विलास महाजन यांना उपनगराध्यक्ष पदाच्या पदभार सोपविला.
आपण नेहमी ऐकत असतो प्रत्येक यशस्वी ते पुरुषामागे स्त्रीच्या हात असतो त्याचप्रमाणे सौ कल्पनाताई महाजन ह्या विलास भाऊ महाजन यांचा यशस्वी मागे खंबीर पणे उभ्या राहतात त्यामुळे विलास भाऊ महाजन हे अहोरात्र समाज सेवेचे कार्य करीत आहे. सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन लक्ष्मी नगर अध्यक्ष तथा मा.नगराध्यक्ष पी एम पाटील सर व सर्व कॉलनीवासी यांनी केले आहे.







