मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेता मनोज वाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन’चा पहिला सीजन तुफान गाजला होता. आता या वेबसीरिजचा दुसरा सीझन अर्थात ‘द फॅमिली मॅन 2’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आज या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि ट्रेलर पाहून चाहते अगदी भारावले. पण ट्रेलरसोबतच या वेबसीरिजने एक वादही ओढवून घेतला. सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले आणि क्षणात #FamilyMan2_against_Tamils हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला.
all tamil peoples please unsubscribe to @PrimeVideoIN
The movie (the family man season 2) against for tamil eelam#FamilyMan2_against_Tamils @Samanthaprabhu2 @PrimeVideo pic.twitter.com/G29rK5NQJB
— இளம்பரிதி (@elamparithi555) May 19, 2021
दक्षिण भारताच्या पार्श्वभूमीवर ‘द फॅमिली मॅन 2’ ची कथा रचली गेली आहे आणि तूर्तास दक्षिण भारतातील लोक ‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर पाहून संतापले आहेत. सीरिजमध्ये श्रीलंकेत आपल्या हिताची लढाई लढणा-या तामिळ बंडखोरांचा संबंध ‘आयएसआयएस’ या अतिरेकी संघटनेशी जोडला गेल्याचा दावा अनेक लोकांनी केला असून सोशल मीडियावर अनेकांनी याबद्दलचा संताप व्यक्त केला आहे. ‘द फॅमिली मॅन 2’ तामिळविरोधी आहे, तामळींना अतिरेक्यांसारखे दाखवण्यात आले आहे, अशा आरोप अनेकांनी केला आहे. विशेष म्हणजे, या पार्श्वभूमीवर अनेकांनी साऊथची सुपरस्टार सामंथा अक्कीनेनीला तामिळ फिल्म इंडस्ट्रीतून हद्दपार करण्याचा इशाराही दिला आहे.
Your movies will not be released in Tamil Nadu anymore!#FamilyMan2_against_Tamils#GetoutSamantha@Samanthaprabhu2 @TamilCineXpress @kalaikugan1 @InsolKeechan pic.twitter.com/EDHffMZ39D
— பாலா நாம் தமிழர் (@balantk98) May 19, 2021
‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर जबरदस्त आहे. 2 मिनिटे 49 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयीने साकारलेल्या श्रीकांत तिवारीची कथा दिसते. या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्पर्धी राजीचा सामना करणार आहे. विशेष म्हणजे, साऊथ स्टार सामंथा अक्किनेनी हिने यात राजीची भूमिका साकारली आहे. एक फॅमिली मॅन व जागतिक दजार्चा गुप्तचर अशा दुहेरी भुमिकेत मनोज वाजपेयीला पाहणे चाहत्यांसाठी एक ट्रीट असणार आहे.






