केंद्र नरमले खत दरवाढ घेतली मागे

स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश; उद्याचे स्वाभिमानीचे आंदोलन स्थगित

https://fb.watch/5A-hLTWGHU/

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – केंद्राने खत दरवाढ मागे घेतली.उद्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खत दर वाढण्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

खतांच्या किंमतीत झालेल्या भरमसाठ वाढीच्या विरोधात बळीराजाने पूर्ण ताकदीनिशी विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यात लाखो शेतकरी पत्र पाठवून आंदोलन करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितले होते. यावर केंद्र सरकारने रासायनिक खतांची केलेली दरवाढ मागे घेतली असुन राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा मोठा विजय आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उद्याचे आंदोलन स्थगित केले गेले असल्याचे नाशिक येथील समन्वयक कुबेर जाधव यांनी बुलंद पोलीस टाइम्सशी बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here