पारोळा येथील तमाशा कलावंताना किराणा वाटप
जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनाच्या या महामारीत सर्व घटकावंर मोठा परिणाम झाला आहे..परंतु कलेवर पोट असणारा लोककलावंत महामारीत होरपळून निघाला आहे. या वर्षभराच्या काळात आनेक संकटाचा सामना करीत कोरोनाने उध्वस्त होत चाललेल्या जिल्ह्यातील लोककलावंता स्थिती अत्यंत हलाखीची होत चालली आहे.. लोकरजंनाचे, लोकप्रबोधनाचे अविरत पणे कार्य करणा-या लोककलावंता कडे शासना सोबतच मायबाप रसिकांनी देखील पाट फिरवल्यामुळे लोककलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मदत करण्याचे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्ष अँड रोहीणीताई खडसे यांनी केले होते.

ॲड.रोहिणीताई यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जैन उद्योग समुहाचे प्रमुख अशोकभाऊ जैन यानी २० किराना किट खान्देश तमाशा व शाहीर लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते.आज पारोळा येथे 20 तमाशा कलावंताना या किराना किटचे वाटप करण्यात आले. अखिल भारतीय नाट्य परिषद व खान्देश तमाशा व शाहीर लोककलावंत विकास परिषदेच्या च्या वतीने सुरू असलेल्या या लोककलावंत मदत अभियानात लोककलावंताच्या घरोघरी जाऊन ही मदत करण्यात येत आहे.

जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोकभाऊ जैन यांनी मदत केलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे आज २० तमाशा कलावंताना वाटप करण्यात आले. याप्रसंगी खान्देश तमाशा परिषदेचे अध्यक्ष शेषराव नाना गोपाळ, नाट्य परिषदेचे कार्यकारणी सदस्य संदिप घोरपडे व लोककलावंत मदत अभियानाचे मुख्य समन्वयक विनोद ढगे आदि उपस्थित होते.






