शहादा तालुक्यातील काथर्दे (पुनर्वसन) येथे कोविड १९ लसीकरण शिबीराचे आयोजन

शहादा (प्रतिनिधी रामेश्वर गिरासे) – कोरोना लसीकरण मोहिम अंतर्गत शहादा तालुक्यातील काथर्दे (पुनर्वसन) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कलसाडी अंतर्गत काथर्दे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा काथर्दे (पुनर्वसन) येथे २० मे रोजी कोविड १९ शिबिराचे आयोजन करण्यात आले.

१८ ते ४४ आणि ४५ वर्षांवरील वयोगटातील लोकांनी मोठ्या संख्येने हजर राहून लसीकरण करून घेतले त्या बरोबर परिसरातील नागरिकांनी ही लसीकरण करून घेतले. लस पुर्णपणे सुरक्षित असुन सर्वांनी लसीकरण करून घ्यावे आणि कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन काथर्दे दिगर ग्रामपंचायत कडून करण्यात आले व त्याचबरोबर शिबिराबाबत पुनर्वसन येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केला.

नागरिकांचे लसीकरणा बाबत असलेला गैरसमज दूर करण्यासाठी काथर्दे ग्रामपंचायतीने विशेष सहकार्य केले यावेळी कलसाडी आरोग्य केंद्राचे कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, प्राथमिक शाळेचे शिक्षक कर्मचारी वर्ग यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here