भरडधान्य केंद्र सुरू करण्यासाठी धरणगाव नायब तहसीलदारांना शेतकरी कृती समितीचे निवेदन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – शासनाने भरडधान्य केंद्र सुरू करावे या मागणीसाठी धरणगाव नायब तहसीलदारांना प्रथमेश मोहोड यांना शेतकरी कृती समिती व शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

गेल्या 1 महिना पासून शासनाने मका ज्वारी गहू खरेदीसाठी नाव नोंदली आहेत तरी अद्यापपावेतो शासनाने खरेदी केंद्र सुरू केली नाही शासनाने लवकरात लवकर खरेदी सुरू करावी अशी मागणी धरणगाव तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव करीत आहेत शासनाने 1 मे 2021 पासून खरेदी सुरू करणार होते तरीही अद्यापपावेतो खरेदी सुरू झाली नाही पावसाळा सुरू होण्यापूर्वी खरेदी झाली तर पुढील शेती पिकांसाठी बी बियाणे रासायनिक खते घेता येतील व शेतकऱ्यांचा घरात असलेले धान्य खराब होणार नाही तरी शासनाने लवकरात लवकर खरेदी सुरू करण्यासाठी धरणगाव नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देतांना शेतकरी कृती समितीचे तालुका समन्वयक गोपाल पाटील, चंदन पाटील, शामकांत पाटील, भारत पाटील, गणेश महाजन, चंद्रकांत पाटील, विठोबा चौधरी, एकनाथ पाटील, नथू चौधरी, वाल्मीक पाटील, बापू जाधव, किशोर पाटील, भागवत पाटील, नरेश पाटील, राहुल पवार, पंकज महाजन, लोटन पाटील, सोपान पाटील, नितीन मराठे, निलेश चौधरी, इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here